शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिका-याने मागितली एक हजाराची लाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:36 IST

वाशिम : मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय नामदेवराव महागांवकर यांनी विहीरीच्या खोदकामाच्या बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने महागावकर यांना अटक केली. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजता घडली.

ठळक मुद्देमालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय महागांवकर यांनी मागितली लाच विहीरीच्या खोदकामाच्या बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची लाच मागितली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केली अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय नामदेवराव महागांवकर यांनी विहीरीच्या खोदकामाच्या बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने महागावकर यांना अटक केली. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत तक्रारदार यांचे वडीलांचे नावे झालेल्या विहीरीचे खोदकामाच्या पहिल्या बिलाचे ७१ हजार रूपयाचा धनादेश खात्यामध्ये जमा करण्यासाठी गटविकास अधिकारी महागावकर याने २९ आॅगस्ट रोजी एक हजाराची लाच मागितली होती. अशी तक्रार १३ सप्टेंबर रोजी वाशिम येथील ए.सी.बी. कार्यालयात दिली. या तक्रारीवरून १४ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता गटविकास अधिकारी महागांवकर यांनी पडताळणी दरम्यान १ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून १८ सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता गर्दी वाढल्यामुळे तक्रारदारावर संशय आला त्यामुळे गटविकास अधिकाºयाने लाचेची रक्कम स्विकारली नाही. १४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गटविकास अधिकारी महागांवकर यांना सोमवारला ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.