शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक व्यक्ती-एक वृक्ष’ उपक्रम साकारला

By admin | Updated: July 7, 2017 01:21 IST

वाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत ६ जुलै रोजी भामदेवी (ता. कारंजा) येथे लोकसहभागातून दोन हजार वृक्षांची लागवड केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत ६ जुलै रोजी भामदेवी (ता. कारंजा) येथे लोकसहभागातून दोन हजार वृक्षांची लागवड केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या प्रेरणेतून गतवर्षीही भामदेवी येथील ग्रामस्थांनी ‘एक व्यक्ती, एक वृक्ष’ याप्रमाणे दोन हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती. वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीसुद्धा सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मिळालेल्या दोन कोटी रुपये निधीतून भामदेवी येथे विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेततळे, नाला खोलीकरण, सलग समतल चर यासारख्या जलसंधारणाच्या कामांचाही समावेश आहे. गतवर्षी या ठिकाणी शासकीय मालकीच्या साडेसहा हेक्टर जमिनीवर समतल चर खोदण्यात आले होते. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान या परिसरात गावातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून आपल्या नावाचे झाड स्वत:च्या हाताने लावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. भामदेवीच्या ग्रामस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली. गाव वनयुक्त बनविण्याचा निर्धार केला. यावर्षीसुद्धा वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचा भामदेवी येथील ग्रामस्थांनी निश्चय केला. त्यानुसार गावामध्ये १८ हेक्टर क्षेत्रावर खोदण्यात आलेल्या सलग समतल चर परिसरात २० मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या उपस्थितीमध्ये लोकसहभागातून खड्डे खोदले होते. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे २ हजार रोपे पुरविण्यात आली. यामध्ये जांभूळ, सीताफळ, आवळा, सिसम, कडूनिंब आदी प्रजातींचा समावेश आहे. या रोपांची ६ जुलैला लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमात ग्रामस्थ, जिल्हाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकारीही सहभागी झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी भामदेवी यथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन गाव वनयुक्त बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.