शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे एक कोटीचे चुकारे प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:25 IST

वाशिम : नाफेडच्यावतीने १0 जून २0१७ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ३ लाख २0 हजार क्विंटल तुरीच्या चुकार्‍यांपैकी १ कोटी २ लाख ८८ हजार रुपयांचे चुकारे अद्याप प्रलंबित असून, शासनाच्या निर्देशानुसार २१ जुलैपासून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू झालेली तूर खरेदीदेखील उधारीवरच असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संकटात तूर खरेदीही उधारीवरच!

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नाफेडच्यावतीने १0 जून २0१७ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ३ लाख २0 हजार क्विंटल तुरीच्या चुकार्‍यांपैकी १ कोटी २ लाख ८८ हजार रुपयांचे चुकारे अद्याप प्रलंबित असून, शासनाच्या निर्देशानुसार २१ जुलैपासून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू झालेली तूर खरेदीदेखील उधारीवरच असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात गतवर्षीच्या रब्बी हंगामात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्या तुलनेत व्यापार्‍यांकडून अगदीच कमी दर मिळत असल्याची ओरड झाल्याने फेब्रुवारी २0१७ पासून शासनाने ५0५0 रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १0 जून २0१७ पर्यंत ३ लाख २0 हजार क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करण्यात आली. मात्र, त्यानंतर शासनाने तूर स्वीकारणे बंद केले. दरम्यान, या तारखेपर्यंत १६१ कोटी ९५ लाख १८ हजार रुपये तुरीच्या चुकार्‍यापोटी शेतकर्‍यांना देणे बाकी होते. या रकमेपैकी १६0 कोटी ९२ लाख रुपये अदा करण्यात आले असून, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अद्याप शासनाकडून मिळणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, जुन्या तुरीचे चुकारे प्रलंबित असताना बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २१ जुलैपासून नव्याने सुरू करण्यात आलेली तूर खरेदीदेखील उधारीवरच सुरू असून, रोख पैसा हाती पडणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. 

१0 जून २0१७ पुर्वीच्या तुरीच्या चुकार्‍याची प्रलंबित असलेली १ कोटी रुपयांची रक्कम मिळविण्यासंदर्भात शासनाकडे सलग पाठपुरावा सुरू आहे. ही रक्कम मिळताच संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात वळती केली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम