मालेगाव: शेलू फाट्यावरून मालेगावकडे येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दुचाकीवरील दुसरा इसम गंभीर जखमी झाला. ही घटना शेलू फाट्यानजीक २४ जानेवारीच्या रात्री ११ वाजतादरम्यान घडली. येथील अकोला फाटा येथे राहत असलेला प्रतीक विष्णुपंत करुले व केदार चंद्रकांत कंझरकर हे शेलू फाट्यावरून रविवारी रात्री ११ वाजता एमएच ३0 डब्ल्यू २0३२ क्रमांकाच्या दुचाकीने घरी येत होते. विरुद्ध दिशेने येणार्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये प्रतीक करुले व केदार कंझरकर गंभीर जखमी झाले. पुढील उपचाराकरिता अकोला येथे येत असताना केदार कंझरकर याचा मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद प्रतीक करुले यांनी दिल्यावरून अज्ञात इंडिका कारच्या चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दुचाकी अपघातात एक ठार; एक गंभीर
By admin | Updated: January 26, 2016 02:23 IST