शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अपघातात एक ठार; दोन गंभीर जखमी

By admin | Updated: January 10, 2017 02:39 IST

कनेरगावनजीकच्या पैनगंगा नदीच्या पुलावर घडला अपघात.

कनेरगाव नाका, दि. ९- विरुद्ध दिशेने येणार्‍या दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन एक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना कनेरगावनजीकच्या पैनगंगा नदीच्या पुलावर सायंकाळी ६.३0 वाजता दरम्यान घडली. कनेरगाववरून एम.एच ३८ आर १0२0 ही दुचाकी तर वाशिमकडून एमएच ३८ आर ६२३३ ही दुचाकी येत होती. या दोन्ही दुचाकींची पैनगंगा नदीवरील पुलावर धडक झाली. यामध्ये कामधेनू इंडस्ट्रीज अँग्रो कंपनीत काम करणारा जिंदर सिंग (३0) हा जागीच ठार झाला तर दुसरा गुरुदीपसिंग (५0) हा गंभीर जखमी झाला. समोरून येणार्‍या दुचाकीवरील विजय गौतम भगत (२५) रा. कानरखेडा खुर्द हा गंभीर जखमी असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला. अपघाताची घटना घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. जखमींना वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले. विजय भगत यांना वाशिमवरून अकोला येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. यावेळी अपघातस् थळी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होती. रस्ता सुरळीत करण्यासाठी चौकीचे जमादार श्याम खुळे व पोलीस नाईक मोहन धाबे यांनी प्रयत्न केला. वाशिम पोलीस स्टेशनला याप्रकरणी माहिती देण्यात आली. अपघातामधील मयत जिंदर सिंग हा पंजाबाचा राहणार असून राजगाव जिल्हा वाशिम येथील कामधेनू अँग्रो इंडस्ट्रिजमध्ये तो काम करीत होता.