ठळक मुद्देस्व.शरद जोशी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य शेतक-यांच्या विरोधात असलेल्या शासकीय धोरणाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शरद जोशी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ३ सष्टेंबर रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी एक दिवसाचे उपोषण केले.स्थानिक महेश भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांसाठी सरकारच्या असलेल्या धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकºयांनी खचून न जाता आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये असे आवाहन यावेळी उपोषणकर्त्यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ठाकरे, ओमप्रकाश तापडीया, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, नारायण विभुते, पुंडलीक कडू, अंबादास डोईफोडे, विजय डोईफोटे, दीपक देशमुख, पुरूषोत्तम पाटील, अन्सार बेग, मुस्लिम बेग यांची उपस्थिती होती.