शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकप्रकरणी एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:20 IST

वाशिम: शहरातील शुक्रवार पेठेतील विठ्ठल मंदिर राजगुरू गल्लीत बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका आरोपीस अटक केली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  घटनास्थळी तीन पथकांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. 

ठळक मुद्दे ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरातील शुक्रवार पेठेतील विठ्ठल मंदिर राजगुरू गल्लीत बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका आरोपीस अटक केली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  घटनास्थळी तीन पथकांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. वाशिम येथील शुक्रवारपेठ भागात विठ्ठल मंदिराजवळ दोन गटात वाद होऊन बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत २ जण जखमी झाले असून, ५ दुचाकी वाहन व एक चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. सदर घटनेची फिर्याद प्रवीण सुरेश खुळे यांनी दिली. या फिर्यादीनुसार वाशिम शहर पोलिसांनी शेख आजीम शेख सरू यास अटक केली तर अन्य २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सदर घटनेमध्ये मोठय़ा प्रमाणात दुचाकी  व चारचाकीचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये संदीप व्यवहारे, प्रवीण ढवळे हे दोन जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहेत. सदर घटनेनंतर पोलिसांनी गुरुवारी तोडफोड झालेल्या दुचाकी व चारचाकी गाड्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात यश मिळविले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या  नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धात्रक, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण साळवे आदी पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दल परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वत्र शांतता राहावी यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून, कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही तसेच कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये आणि शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम करू नये, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही.- मोक्षदा पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम