मानोरा (जि. वाशिम) : तालुक्यामधील वृद्ध साहित्यीक, कलावंताचे ३0 हजार रूपये सप्टेंबर २0११ पासून आजपर्यंत बॅक खात्यात जमा न झाल्याने ते त्यापासून वंचित असल्याची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रणजित पाटील यांच्याकडे कलावंत सदस्य नारायण खाडे मानोरा यांनी केले. त्यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असून ती पण देण्यात आली नाही. तसेच दि. १/७/२0१४ पासून प्रलंबित मानधन तसेच १७/७/२0१४ पासून ५00 रू प्रमाण्ो वाढ करण्यात आलेली आहे. तेही न मिळाल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रतिलीपी मुख्यकार्यालयात अधिकारी जि.प. वाशिम, समाजकल्याण अधिकारी जि.प. वाशिम यांना दिले आहे.
वृद्ध साहित्यीक, कलावंत वंचित
By admin | Updated: February 27, 2015 00:45 IST