शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:16 IST

वाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देवाशिम नगर परिषद मुख्याधिकारी, अध्यक्षांनी हाती घेतले झाडू!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.या अभियानादरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो इ. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रेल्वेस्थानक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध भागातील स्वच्छता करून नागरिकांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पद्धतीने जनजागृती उपक्रम राबवून जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले होते. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी केले. तसेच आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, याबाबतसुद्धा मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा, सभापती राहुल तुपसांडे, उमेश मोहळे, बाजार समितीचे सदस्य हिराभाई जानीवाले,  राजूभाऊ जानीवाले, अभियंता विनय देशमुख,  कनिष्ठ अभियंता राजेश घुगरे, स्वच्छता विभागाचे जितू बढेल,  काष्टे, राजेश महाले,  संतोष किरळकर, नागापुरे, यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी, नगर परिषदेचे पदाधिकारी व बाजार समितीमधील सदस्यांची उपस्थिती लाभली होती.

 १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष जनजागृती अभियानांतर्गत शहरात विविध भागांची स्वच्छता करून जनजागृतीचे कार्य हाती घेण्यात आले आहे.- गणेश शेटेन.प. मुख्याधिकारी, वाशिम

शहर स्वच्छतेला आपण सुरुवातीपासूनच महत्त्व दिले आहे. त्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविणार असलेले ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आले. यामुळे आपला उद्देश सफल झाला. यासाठी सर्व जण तन-मन-धनाने काम करणार आहेत.- अशोक हेडा, नगराध्यक्ष