वाशिम : 'आमचं गावं- आमचा विकास' या नव्याने सुरु झालेल्या कार्यक्रमाची पहिली कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी झाली. या कार्यशाळेत गावाचा विकास साधण्यासाठी अधिकार्यांची भूमिका काय? याबाबत अधिकार्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. पाटील यांनी या नवीन उपक्रमाच्या मागील शासनाचा उद्देश स्पष्ट केला. गावाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपले योगदान देण्याचे आवाहन केले. यशदा पुणे येथील प्रमुख प्रशिक्षक रोहिदास भोयर आणि गणेश पोटे यांनी दिवसभर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान एलसीडी प्रोजेक्टरवर यशोगाथा चित्रफीत दाखविण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सर्व विभागप्रमुख, सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर, गटविकास अधिकारी दि. बी. पवार आणि मनोहर खिल्लारी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देवीदास हिवाळे यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी राम श्रुंगारे यांनी केले.
अधिका-यांचा प्रशिक्षण वर्ग
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST