लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निदेर्शानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १५ सप्टेबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जन जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगरपरिषदेच्यावतिने यासंदर्भात जनजागृती करुन स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेवून शहरातील विविध भागातील स्वच्छता केली.विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.या अभियाना दरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो ई. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह पदाधिकारी यांनी रेल्वेस्थानक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध भागातील स्वच्छता करुन नागरिकांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पध्दतीने जनजागृती उपक्रम राबवुन जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले होते. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करुन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी केले. तसेच आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल याबाबत सुध्दा मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा, सभापती राहुल तुपसांडे, उमेश मोहळे, बाजार समितीचे सदस्य हिराभाई जानीवाले, राजुभाऊ जानीवाले, अभियंता विनय देशमुख, कनिष्ठ अभियंता राजेश घुगरे, स्वच्छता विभागाचे जितु बढेल, काष्टे, राजेश महाले, संतोष किरळकर, नागापुरे, यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी व बाजार समितीमधील सदस्यांची उपस्थिती लाभली होती.
अधिकारी, कर्मचा-यासह पदाधिकारी गुतंले स्वच्छतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:56 IST
वाशिम : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निदेर्शानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १५ सप्टेबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जन जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगरपरिषदेच्यावतिने यासंदर्भात जनजागृती करुन स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेवून शहरातील विविध भागातील स्वच्छता केली.विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
अधिकारी, कर्मचा-यासह पदाधिकारी गुतंले स्वच्छतेत
ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन १५ सप्टेबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा जन जागृती अभियान