कारंजा येथील सहायक निबंधक कार्यालयात नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी कर्मचारी गेला असता, त्याला २५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यालयाच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडलेली व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आल्याने त्याने घटनेची माहिती सहायक निबंधक पी एन गुल्हाने यांना दिली. माहिती मिळताच गुल्हाने यांनी कार्यालय गाठले व कार्यालयाची पाहणी केली असता, समोरच्या रूममधील तीन आलमाऱ्या तोडलेल्या व त्यामधील काही फाईल तसेच इतर साहित्य बाहेर फेकल्याचे आणि इतर दोन रूममधील दोन आलमाऱ्यासुद्धा फोडल्याचे व फाईल अस्तावेस्त केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी आलमाऱ्या फोडल्यामुळे काही महत्त्वाचे दस्तावेज चोरी गेल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. वृत्त लिहिस्तोवर नेमकी कोणती कागदपत्रे चोरी गेली, याबाबत सविस्तर माहिती प्राप्त होऊ शकली नाही, तसेच सहायक निबंधक कार्यालय फोडून त्यातील कागदपत्रे चोरून नेण्यामागे चोरट्यांचा काय हेतू हेाता व यामागील मुख्य सूत्रधार कोण, असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहेत.
कारंजातील सहायक निबंधक कार्यालय फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST