शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात अडथळा; वकिलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सरदारसिंग सोनोने यांनी फिर्याद दिली की, २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान पोलीस ...

मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सरदारसिंग सोनोने यांनी फिर्याद दिली की, २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान पोलीस अधीक्षक हे मालेगाव येथे आले असता, यादरम्यान पेट्रोलिंग करीत असताना समोरून येणाऱ्या एम. एच. ३७ व्ही २१२३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला थांबविले. कडक निर्बंध व संचारबंदी लागू असल्याचे सांगून बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता, अ‍ॅड. सुदर्शन गायकवाड यांनी अत्यंत उर्मट भाषेत उत्तर दिले. कायदेशीर कारवाई करताना शासकीय अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भादंवि कलम ३५३, ३३२, १८६, २९४, ५०४, १८८, २६९, २७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉक्स

वकील संघाकडून निषेध

पोलिसांनीच वकिलाला विनाकारण मारहाण केल्याचा उल्लेख करीत वकील संघ व तालुका बार असोसिएशनने या घटनेचा निषेध केला. वकील संघाने घेतलेल्या ठरावात नमूद केले की, अ‍ॅड. सुदर्शन गायकवाड हे शेतातून येत असताना पोलिसांच्या ताफ्याला ओव्हरटेक का केली म्हणून वाहन पोलीस स्टेशनला लावण्यास सांगितले. यावेळी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला दवाखान्यात न्यायचे आहे, असे सांगितले. याची शहानिशा म्हणून अ‍ॅड. गायकवाड यांच्यासोबत एक कमांडो घरी पाठविला. यावेळी कमांडोने बाचाबाची केली. तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शिवीगाळ व मारहाण केली, असे वकील संघाने घेतलेल्या ठरावात नमूद केले. यावर अ‍ॅड. महेश शेलकर, अ‍ॅड. एस जे सोमाणी, अ‍ॅड. एस. एन. मगर, अ‍ॅड. अग्रवाल, अ‍ॅड. पुरोहित, अ‍ॅड. पवन गट्टानी, अ‍ॅड. विजय बळी, अ‍ॅड. ज्ञानेश्वर कराळे, अ‍ॅड. दिनेश शर्मा, अ‍ॅड. कैलाश चतरकर, अ‍ॅड. के अन सोळंके, अ‍ॅड. बी. के. साठे यांच्यासह जिल्ह्यातील वकिलांच्या सह्या आहेत.