शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता गावोगावी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ !

By admin | Updated: May 6, 2017 00:52 IST

गाळ उपसण्यासाठी मशीन, इंधनाचा खर्च राज्य शासन देणार; जलसंधारण मंत्र्यांची माहिती.

वाशिम : राज्यात "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेतून राज्यातील ३१ हजार पेक्षा अधिक धरणांतून गाळ उपसा करण्यात येणार असल्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी सांगितले. ह्यगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारह्ण योजनेतून वाशिम तालुक्यातील बोराळा धरणातील गाळ उपसा कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या योजनेतून सुरु होणारे बोराळा येथील सदर काम हे राज्यातील काम असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.यावेळी आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जलसंधारण विभागाचे उपसचिव नारायण कराड, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, तहसीलदार बळवंत अरखराव, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर आदी उपस्थित होते.ना. शिंदे म्हणाले की, राज्य शासनामार्फत राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे. या अभियानाच्या धर्तीवर ह्यगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारह्ण अभियान राबविण्याचा निर्णय २ मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील पहिल्याच कामाचा शुभारंभ ४ मे रोजी बोराळा धरणातील गाळ उपसा कामापासून होत आहे. नवीन धरणे बांधणे, त्यासाठी जमिनींचे अधिग्रहण या खूप खर्चिक बाबी आहे. त्याऐवजी अस्तित्वात असलेले लघु पाटबंधारे विभागाचे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव यामधील गाळ उपसा करून त्यांची साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.धरणातील गाळ उपसा करून तो शिवारात टाकल्याने शेतकर्‍यांचा दुहेरी फायदा होणार आहे. सुपीक गाळ शिवारात टाकल्याने शेतकर्‍यांचा महागडी रासायनिक खतांवरील खर्च कमी होईल. धरणामध्ये साचलेला गाळ नेण्यासाठी शेतकर्‍यांनी आपले प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करावेत. गाळ उपसा करण्यासाठी लागणार्‍या मशीन व त्याचा इंधनाचा खर्च शासन देणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.