शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता खंडाळ्याच्या शेतक-यांचाही खरीप हंगामावर बहिष्कार!

By admin | Updated: March 21, 2016 01:49 IST

जामदरा येथील शेतक-यांनंतर खंडाळा येथील शेतकरीही आंदोलनाच्या पवित्र्यात.

मनोहर राठोड /चौसाळा(जि. वाशिम)गत तीन वर्षांंपासून दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आता परिस्थितीपुढे हतबल होत असल्याचे दिसून येते. याच हतबलतेतून मानोरा तालुक्यातील खंडाळा येथील शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.विविध कारणांमुळे शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने आणि शासन-प्रशासनाचा डोक्यावर हात नसल्याने अडचणीत भर पडत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत गुंतवणूक केलेली रक्कमही वसूल होत नसल्याने, हताश होत शेतकरी खरीप हंगामात पेरणी न करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपत आहेत. १५ दिवसांपूर्वीच मानोरा तालुक्यातील जामदरा गावाने येत्या खरीप हंगामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता मानोरा तालुक्यातीलच खंडाळाच्या पारधी तांडा येथील ७५ टक्के शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या दुष्काळावर राजकीय नेतेमंडळी केवळ राजकारणच करीत आहे. शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. राजकीय नेत्यांकडून शेतकर्‍यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या मानोरा तालुक्यातील खंडाळा पारधी तांडा येथील शेतकर्‍यांनी पेरणी न करता जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. ह्यमाय जेवू घालत नाही अन् बाप भीक मागू देत नाहीह्ण अशा दुहेरी विवंचनेत अडकलेला शेतकरी आजमितीला मरणाच्या दारात उभा आहे. निसर्गाच्या अस्मानी, तर शासनाच्या सुल्तानी संकटाने शेतकर्‍याला हतबल केले आहे. निसर्गाचा लहरीपणा, पाचवीला पुजलेला दुष्काळ, त्यातूनच जन्मलेली नापिकी, उभा झालेला कर्जाचा डोंगर यामुळे जगण्याची उमेद राहिली नसल्याची मानसिकता शेतकर्‍यांची बनत चालली आहे, असे खंडाळा येथील शेतकर्‍यांचे मत आहे.