शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता उपसरपंच पदासाठी लावली जातेय फिल्डिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 20:11 IST

वाशिम: पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २७३ आणि दुस-या टप्प्यात १४ अशा एकूण २८७ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर, आता उपसरपंच पदासाठी आपला समर्थक, हितचिंतक विराजमान करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक संख्येचे गणित जुळविण्याची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २७३ आणि दुस-या टप्प्यात १४ अशा एकूण २८७ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर, आता उपसरपंच पदासाठी आपला समर्थक, हितचिंतक विराजमान करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणाºया २७३ ग्राम पंचायती आणि डिसेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणाºया १४ ग्राम पंचायतचे सरपंच थेट जनतेतून निवडल्यानंतर आता केवळ उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाने अद्याप उपसरपंच पदाच्या निवडणुक तारिखा जाहिर केलेल्या नाहीत. तथापि, उपसरपंच पदासाठी स्थानिक राजकीय नेते, आघाडी प्रमुखांकडून आतापासूनच फिल्डिंग लावली जात असल्याचे दिसून येते.  काही ग्रामपंचायतमध्ये सरपंच एका गटाचा तर सदस्य संख्येचे बहुमत दुसºया गटाकडे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सदस्यांमधून उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे, सदस्य संख्येचे गणित जुळवून आणण्यासाठी आघाडी प्रमुखांकडून व्यूहरचना आखली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे नेतेदेखील आपला समर्थक, हितचिंतक उपसरपंचपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. उपसरपंच पदाची निवडणूक तारिख केव्हा जाहिर होते, याकडे २८७ ग्रामपंचायतींचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत