साहेबराव राठोड / मंगरूळपीरआगामी विधानसभा निवडणुक डोळय़ा समोर असतांना मतदारसंघात मोठी उलथ पालथ होण्याची अपेक्षा होती. मात्र पक्षा अंर्तगतच घडामोडी घडतांना दिसताहेत राज्याच्या राजकारणात मोठय़ा प्रमाणात पक्षांत्तर होत आहे परंतु वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षात ह्यना इनकमिंग ना आऊट गोईंग होतांना दिसत नाही. सर्वच राजकीय पक्षाची व नेत्यांची प्रतिष्ठा उमेदवारी मिळविण्यात लागली असल्याचे दिसुन येते.जिल्हय़ाच्या राजकारणात मंगरूळपीर तालुक्याला मोठे महत्व प्राप्त आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस,शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस,भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबतच भारीप बहुजन महासंघाचे जिल्हयाचे नेते पदाधिकारी,कार्यकर्ते याच भागात आहेत. जिल्हय़ाचे नेतृत्व करणारे विविध पक्षाचे अनेक नेते पदाधिकारी तालुक्यातील आहेत. सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते सद्या बेरीज व वजा बाकीचे राजकारण करतांना दिसत नाही.राज्याचे राजकारणात विविध पक्षाचे नेते, माजी मंत्री पदाधिकारी पक्षांत्तर करीत आहे.परंतु मंगरूळपीर तालुक्यात व वाशीम विधानसभा क्षेत्रात पक्षांत्तर होतांना दिसत नाही. त्यामुळे पदाधिकारी,कार्यकर्ते आहे त्याच पक्षात राहणार व काम करणार असेच चित्र सद्यास्थितीत आहे. काही बोटावर मोजण्या इतपत काही पदाधिकारी सोडले तर कोणत्याच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांंंनी दुसर्या पक्षात प्रवेश केला नाही.जे इच्छुक आहेत ते उमेदवारी आपल्यालाच मिळावी म्हणुन आप आपल्या वरिष्ठ नेते मंडळीच्या संपर्कात आहेत.मात्र निष्ठावंत कार्यकर्ते सद्या तरी कोणा एका उमेदवाराला लाईक न करता ज्यांना उमेदवारी मिळेल त्यासाठी जोमाने काम करू असे बोलुन दाखवित आहे.काही कार्यकर्ते धनवान इच्छुकांना उमेदवारी मिळाल्यास आपलं चांगभल होईल म्हणुन डोहाळे लावुन बसले आहेत.तर काहीजण निष्ठावंताची कदर पक्षाचे करावी असे सांगताहेत त्यामुळे येणारी विधान सभा निवडणुक या मतदार संघात अतिशय चुरसमय होईल असे चित्र सद्यास्थ्तिीत दिसून येत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र सर्व जोमाने कामाला भिडले आहत.** लोकसभा निवडणुकीच्यावेळी अनेकांचे पक्ष प्रवेश झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोटावर मोजण्याईतपतच नेते, कार्यकर्त्यांंंचा पक्षप्रवेश झाला आहे. विधानसभा निवडणुक लक्षात घेता काही सक्रीय पदाधिकार्यांना आपल्या पक्षात प्रवेशासाठी काही राजकीय मंडळी प्रयत्न करीत आहेत.
ना ‘इनकमिंग’ ना ‘आऊट गोईंग’
By admin | Updated: September 4, 2014 23:00 IST