शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

सौर कुंपण योजनेसाठी निधीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST

वाशिम : वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान टाळण्यासाठी वन परिसरात सौर कुंपण योजना अंमलात आणण्याची तयारी राज्य शासनाने केली खरी; ...

वाशिम : वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान टाळण्यासाठी वन परिसरात सौर कुंपण योजना अंमलात आणण्याची तयारी राज्य शासनाने केली खरी; परंतु तीन महिन्यांनंतरही जिल्ह्यातील आराखड्यांना शासनाकडून ना मंजुरी मिळाली ना निधी मिळाला. त्यामुळे सौर कुंपण योजना प्रत्यक्षात अंमलात येणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान आणि यातून घडत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जंगली भागातील शेती सौर कुंपणाने संरक्षित करण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेंतर्गत शिव पीक संरक्षण योजना राबविण्याचा निर्णय चार महिन्यांपूर्वी घेतला. या योजनेत गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ यासह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे. शिव पीक संरक्षण योजनेंतर्गत सौर कुंपण योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी शासनाने वनालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अभिप्राय मागविण्यासह वन्यप्राण्यांमुळे सर्वाधिक पीक नुकसान होणाऱ्या गावांची यादी तयार करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावून यासंदर्भातील कृती आराखडा तयार केला. संवेदनशील असलेल्या वन परिक्षेत्राच्या सीमेपासून ५ किलोमीटर अंतरात असलेल्या गावांत सामूहिक जाळीचे कुंपण या योजनेंतर्गत तयार करण्याचे नियोजित असून, तसा आराखडा वनविभागाने तीन महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर केलेला आहे. मात्र, या आराखड्याला शासनाकडून ना मंजुरी मिळाली ना निधी मिळाला. त्यामुळे पुढील कार्यवाही थांबली आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोराेनामुळे आता या योजनेसाठी निधी मिळणार की नाही याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

ुु

शेतकऱ्यांना मिळणार होते ७५ टक्के अनुदान

शिव पीक संरक्षण योजनेत शेतकऱ्यांना कुंपणासाठी सौरऊर्जा चलित पॅनल शेतालगत बसविण्यासाठी एकूण खर्चाच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये यापेक्षा कमी असणारी रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना सामूहिक स्वरूपाची असल्याने सलग शेती असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तयारी देखील केली. मात्र, अद्याप निधी मिळाला नाही.