शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:57 IST

वाशिम :  जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २0१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती निवडणूकतीन जागांसाठी होणार लढत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २0१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्याकडे उमेदवारास किंवा त्यांच्या सुचकास २२ ते २८ ऑगस्ट २0१७ रोजी (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपयर्ंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. जसजशी नामनिर्देशनपत्रे प्राप्त होतील, त्याप्रमाणे नोटिस बोर्डवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रांचे नमुने अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. २९ ऑगस्ट २0१७ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ ऑगस्ट २0१७ पयर्ंत जिल्हाधिकार्‍यांकडे अपील करता येणार आहे. १ सप्टेंबर २0१७ पयर्ंत जिल्हाधिकारी यांच्याकडील अंतिम निर्णय होईल. अपिलांतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर २0१७ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पयर्ंत आहे. ५ सप्टेंबर २0१७ रोजी सायंकाळी ४ वाजता निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यकता असल्यास १४ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपयर्ंत मतदान घेतले जाईल. १५ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी १0 वा. पासून मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर लगेच निकाल घोषित केला जाणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. -