शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीचा तिढा सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:17 IST

वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सन २00९ पासून एकही रुपया शिष्यवृत्ती मिळाली नव्हती.

ठळक मुद्देशासनाकडून दखल विद्यार्थ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने रक्कम जमा२0१0-२0११ मधील रक्कम अद्याप प्रलंबित!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सन २00९ पासून एकही रुपया शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. दरम्यान, विविध वृत्तांच्या माध्यमातून ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा यामुळे यशस्वी झाला असून केंद्रशासनाने शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम मंजूर केली असून ती टप्प्याटप्प्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.२00७-0८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेतली जाते. या परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५00 रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, २00९ पासून २0१६ पर्यंतच्या कालावधीत दरवर्षी झालेल्या परिक्षेत वाशिम जिल्ह्यातील एकंदरित ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण होवून शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र ठरले. त्यापैकी २0१0 आणि २0११ या दोन वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम वगळून उर्वरित ५८३ विद्यार्थ्यांच्या खात्यात चालू आठवड्यापाूसन टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यास वाशिमच्या माध्यमिक शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे.तथापि, ‘लोकमत’ने विविध वृत्तांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या प्रलंबित रकमेचे प्रकरण उजागर केले. त्याची दखल घेवून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शिक्षण विभाग, एनसीईआरटी (नवी दिल्ली) कडे पत्रव्यवहार केला. यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे अखेर शिष्यवृत्तीस पात्र जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असून संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

२0१0-२0११ मधील रक्कम अद्याप प्रलंबित!२0१0 आणि २0११ या दोन वर्षांत एकूण २६८ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाले होता. मात्र, हा अहवाल शासनाकडे निर्धारित मुदतीत सादर करण्यात वाशिमचे तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी विश्‍वास लबडे यांनी हयगय केली. त्यामुळे देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपयाची रक्कम अद्याप प्रलंबित असून ती शासनाने मंजूर केलेली नाही. याऊलट सदर रक्कम लबडे यांच्याकडूनच वसूल करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. 

सन २00९ पासून शासनाकडे प्रलंबित असलेली ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परिक्षेची प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांंच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया थेट केंद्रशासनस्तरावरून होत असल्याने आतापर्यंत किती विद्यार्थ्यांंना लाभ मिळाला, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही.- ललित भुरेसमन्वयक, एनएमएमएस परिक्षा, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, वाशिम