शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेत नऊ विद्यार्थी निलंबित

By admin | Updated: March 1, 2016 01:15 IST

वाशिम जिल्हास्तरीय भरारी पथकाची कारवाई.

वाशिम : इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेत शनिवार व सोमवार अशा दोन दिवसात एकूण नऊ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. या विद्यार्थ्यांंना निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. वाशिम जिल्ह्यात नियमित १५ हजार ४९८ आणि पुनर्परीक्षार्थी ६८३ असे एकूण १६ हजार १८१ विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. मराठी पेपरला कॉपी करताना पाच विद्यार्थी निलंबित झाले होते. जिल्ह्यात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय दक्षता पथक कार्यरत असताना केवळ जिल्हास्तरीय पथकाद्वारे कॉपीमुक्त अभियानांतर्गत कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे तालुकास्तरीय पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. २६ फेब्रुवारी रोजी बारावी विज्ञान शाखेच्या गणित विषयाच्या पेपरला जिल्हाधिकार्‍यांच्या भरारी पथकाने काटा व जऊळका रेल्वे येथील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या. दोन्ही परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी दोन, असे चार विद्यार्थी कॉपी करताना रंगेहात पकडल्याने निलंबित करण्यात आले. २९ फेब्रुवारी रोजी वाकद येथील परीक्षा केंद्रावर पाहणी केली असता, दोन विद्यार्थ्यांना कॉपीप्रकरणी निलंबित करण्यात आले. कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात पथकातील नायब तहसीलदार नीलेश मडके, अव्वल कारकून ज्ञानेश्‍वर बाजड, लिपिक अमोल देशमुख यांनी केली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिनेश तरोळे यांच्या पथकाने शनिवारी शिरपूर जैन येथील परीक्षा केंद्राला भेट दिली असता, दोन विद्यार्थ्यांंना कॉपीप्रकरणी निलंबित केले. २९ फेब्रुवारी रोजी तराळे यांच्या पथकाने धावंडा येथील एका विद्यार्थ्याला कॉपी करताना रंगेहात पकडल्याने निलंबित केले.