शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:24 IST

महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविली जाते. गरीब व वंचितांसाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेमध्ये वधू-वरांना प्रति जोडपे दहा हजार रुपये व विवाह सोहळा आयोजक संस्थेस दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत खोटा प्रस्ताव सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या देवळी (जि. अकोला) येथील रिहाई बहूद्देशीय संस्था अध्यक्ष सागर दामोदर सदाशिव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देशुभमंगल योजनेच्या अनुदानासाठी खोटा प्रस्ताव शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविली जाते. गरीब व वंचितांसाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेमध्ये वधू-वरांना प्रति जोडपे दहा हजार रुपये व विवाह सोहळा आयोजक संस्थेस दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत खोटा प्रस्ताव सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या देवळी (जि. अकोला) येथील रिहाई बहूद्देशीय संस्था अध्यक्ष सागर दामोदर सदाशिव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी कळविले आहे.रिहाई बहूद्देशीय संस्थेच्यावतीने कामरगाव (ता. कारंजा) येथे २४ जानेवारी २0१६ रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केल्याचे सांगून शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावातील लाभार्थींच्या दस्तऐवजाबाबत शंका निर्माण झाल्याने महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांनी प्रस्तावातील लाभार्थींच्या गृह चौकशीचे आदेश दिले. या चौकशीअंती सदर संस्थेद्वारे आयोजित सामूहिक विवाह मेळाव्यातील लाभार्थींचे खोटे दस्तावज सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये रिहाई बहूद्देशीय संस्था अध्यक्ष सागर दामोदर सदाशिवविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१ अन्वये १६ ऑगस्ट २0१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही संस्था काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे राठोड यांनी कळविले आहे.शासनाच्या शुभमंगल सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत यापुढे ज्या संस्थांना सामूहिक विवाह आयोजित करावयाचे आहेत, त्यांनी जोडप्यांची शहानिशा करूनच प्रस्ताव दाखल करावा. अन्यथा जोडप्यांचे दस्तावेज खोटे आढळल्यास संस्थेला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच यापुढे स्वत: जोडप्यांनी पुढे येऊन विवाह नोंदणीचे सहायक निबंधक यांच्याकडे विवाह नोंदणी करून अनुदान योजनेचा लाभ घ्यावा. सर्वसाधारण, इतर मागास प्रवर्गातील विधवा महिलेच्या मुलींच्या विवाहाकरिता व नोंदणीकृत विवाहांनासुद्धा अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली