शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 5, 2016 03:25 IST

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; दुष्काळाची केली पाहणी.

मेडशी (रिसोड, जि. वाशिम) : सतत तीन वर्षांंपासून असलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाई, चाराटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, शेतकर्‍यांच्या समस्यांशी शासनाला काहीही घेणे-देणे नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करताना केला. सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चार्‍याअभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अशा बिकट परिस्थितीतदेखील सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. कृषी मंत्र्यांवर हल्ला चढवित ते म्हणाले, की सरकारने गोहत्या बंदी केली ते चांगले झाले; मात्र गोवंश हत्याबंदीमुळे शेतकर्‍यांना आपली जनावरे विकता येत नाही. जनावरांना, शेतकर्‍यांना जगविणे सरकारची जबाबदारी असताना सरकार उद्योगपतींना जगवित आहे. हे सरकार उद्योगपती अंबानी, अदानी यांना जगवित आहे. शेतकर्‍यांचे १३ कोटीचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची ६५ हजार कोटींची कर्जे माफ होतात. मेक इन महाराष्ट्रामध्ये मेडशी आहे का, वाशिम जिल्हा आहे का, असा सवालही त्यांनी केला. आदिवासी ग्राम कोळदरा व वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांंशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक आमदार अमित झनक यांनी केले. यावेळी मेडशी व परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष कोरपे, वामनराव देशमुख आदींची उपस्थिती होती.