शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गरज १४0९ हेक्टरची; जमीन मिळाली केवळ २.७८ हेक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:20 IST

वाशिम : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी देण्याबाबत शेतकर्‍यांचा विरोध अद्याप कायम असून काही शेतकर्‍यांनी तर महामार्गासाठी एक एकरही जमीन न देण्याची शपथ घेतली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जुलैपासून सुरू झालेली भूसंपादन प्रक्रिया केवळ पाच शेतकर्‍यांच्या (२ हेक्टर २७ आर) भूसंपादनाचा अपवाद वगळल्यास पुढे सरकू शकली नाही. 

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग निर्मितीमधील अडथळे दूर होईना शेतकर्‍यांचा विरोध कायम

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी देण्याबाबत शेतकर्‍यांचा विरोध अद्याप कायम असून काही शेतकर्‍यांनी तर महामार्गासाठी एक एकरही जमीन न देण्याची शपथ घेतली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जुलैपासून सुरू झालेली भूसंपादन प्रक्रिया केवळ पाच शेतकर्‍यांच्या (२ हेक्टर २७ आर) भूसंपादनाचा अपवाद वगळल्यास पुढे सरकू शकली नाही. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या नागपूर-मुंबई या ७१0 किलोमिटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (सुपर कम्युनिकेशन हाय-वे) निर्मितीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या चार तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जाणार्‍या या महामार्गासाठी १४0९ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी पुर्वी शासनाने शेतकर्‍यांसमोर भू-संपादन आणि भू-संचय, असे दोन पर्याय ठेवले होते. त्यापैकी भू-संचय पद्धत शेतकर्‍यांच्या हिताची ठरणार असल्याचा मुद्दा समोर करत शासनाने विविध स्वरूपातील फायदे जाहीर करून शेतकर्‍यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास संबंधित शेतकर्‍यांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भू-संचय पद्धतीने जमिनी घेण्याचा विचार सोडून देत २२ जुलैपासून केवळ भू-संपादनाच्या माध्यमातून जमिनी घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. बाजारभावाच्या पाच पट अधिक मोबदला देवून २२ जुलैला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर जबाबदार अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पाच शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, हा अपवाद वगळता कुठल्याच शेतकर्‍याची जमीन संपादित करण्यात आलेली नाही. या प्रक्रियेसही शेतकर्‍यांमधून तीव्र विरोध दर्शविला जात असल्यानेच ही स्थिती उद्भवली असून २९ जुलै रोजी वनोजा (ता.मंगरूळपीर) येथे झालेल्या समृद्धी महामार्ग संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत या महामार्गासाठी एक एकरही जमिन न देण्याची शपथ शेतकर्‍यांमधून घेण्यात आली आहे. यामुळे मात्र शासनाची डोकेदुखी वाढली असून महामार्ग निर्मिती प्रक्रियेलाही अनपेक्षित ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे.