शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या मेळाव्यांनी वाढविले कॉग्रेसचे ‘ब्लडप्रेशर’

By admin | Updated: September 18, 2014 01:13 IST

रिसोड मतदारसंघावर डोळे ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी.

मालेगाव : रिसोड मतदारसंघावर डोळा ठेवून राष्ट्रवादी कॉग्रेसने सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे मित्रपक्ष असलेल्या कॉग्रेसचे ब्लडप्रेशर वाढायला सुरूवात झाली आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर असलेल्या या मतदार संघावर सद्या राष्ट्रवादी कॉग्रेससने दावा केला आहे. एवढेच नव्हेतर मतदार संघात विविध कार्यक्रम, मेळावे घेऊन वातावरण निर्मितीही चालविली आहे. आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेससाठी न सुटल्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नेते येथे बंडाचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, आघाडीत बिघाडी येवू पाहत असुन या निमित्ताने पून्हा एकदा राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. आगामी १५ ऑक्टोंबरला जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात निवडणूक होऊ घातली आहे. परिणामी राजकीय वातावरण तापायला प्रारंभ झाला आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रस व पिपिल्स रिपब्लिीकन पक्षाच्या आघाडीत रिसोड व वाशिम हे दोन मतदार संघ कॉग्रेसच्या तर कारंजा हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आहे. यापैकी रिसोड मतदार संघावर अचानक राष्ट्रवादी कॉग्रेसने दावा केला आहे. या मतदार संघात समाविष्ट असलेल्या मालेगाव व रिसोड तालुक्यात पक्षाचे चांगले नेटवर्क असल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेससाठी सोडण्यात यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रैष्ठीकडे केली आहे. यानुसार प्रदेश कार्यकारिणीने वाढीव मतदार संघांमध्ये रिसोड राष्ट्रवादी कॉग्रेससाठी सोडण्यात यावा अशी मागणी कॉग्रेसकडे केली आहे. कॉग्रेस मात्र राष्ट्रवादीचा हा दावा मानायला तयार नाही. गत एप्रिल महिन्यात पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीत मोदीच्या लाटेतही कॉग्रेसने या मतदार संघात विजयश्री खेचून आणला होता. त्यामुळे मतदार संघात येणार्‍या मालेगाव व रिसोड या दोन्ही तालुक्यात कॉग्रेस पक्षाचे संघटन मजबुत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कॉग्रेसचा बोलबाला आहे. सन १९९९ व सन २00४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचा अपवाद वगळल्यास या मतदार संघाने कॉग्रेसलसाच बळ दिले असल्याचा इतिहास आहे.