शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

नॅझरीन चर्चला शंभर वर्षे पूर्ण

By admin | Updated: March 15, 2015 00:44 IST

शताब्दी सोहळय़ाचे आयोजन; ख्रिस्ती बांधवात उत्साहाचे वातावरण.

विश्‍वास वाल्ले / वाशिम : वाशिम शहराच्या मध्यभागी नंदीपेठ जवळ ख्रिस्त्री धर्माचे नॅझरीन चर्च मागील अनेक वर्षापासून उभे आहे. आज या प्रार्थनास्थळाचा १00 वष्रे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त येथील नासोरी येशूची मंडळींनी चर्च या शताब्दी सोहळा आयोजित केला आहे. हे चर्च सन १५ फेब्रुवारी १९९५ रोजी बांधण्यात आले आहे.इंग्रजांच्या राजवटीतील या वास्तुचे उद्घाटन फॉक्स मेमोरिअल यांच्या हस्ते संपन्न झाले. तेव्हापासून येथील ख्रिस्त मंडळी दर रविवारी प्रार्थनेसाठी एकत्र येतात. अनेक वर्ष या चर्चवरील घंटा प्रार्थनेसाठी रविवारी सकाळी खणखणत असे. या घंटेचा आवाज रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरापर्यंत ऐकु जात होता. त्यानंतर येथील ख्रिस्ती मंडळी वाढत गेली सन १९७९ दरम्यान पुसद मार्गावर नविन चर्च बांधण्यात आले तेव्हापासून या ऐतिहासीक चर्चमध्ये नियमित प्रार्थना होत नाही. तरी अनेक धार्मिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळे येथेच होतात. १00 वर्षापूर्वी वाशिम येथे इंग्रजांचे राज्य होते. त्यापूर्वीच १८७५ मध्ये मिशनेरी वाशिम येथे आले येथे शिक्षणाची अत्यल्प सोय असताना सन १९00 ते १९३५ दरम्यान पुसद मार्गावर मुला मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरु केली तेथे बोर्डीगची व्यवस्था मिशनेरींनी केली होती. सन १९३५ मध्ये नॅझरीन मिशन व मॅथॉडिस्ट चर्च यांचा सर्व कारभार, चर्च, शाळा, यांचे हस्तांतर करार होऊन येथे नॅझरीन चर्च कार्यमान झाले. या चर्चच्या पहिल्या पालकाचा मान रेव्ह एस.वाय. साळवे यांनी मिळविला. त्यानंतर येथील बायबल कॉलेजमधून प्रशिक्षित झालेले लुथर मानमोठे, सुर्वातिर्थ गायकवाड व प्रभाकर भुजबळ हे पालकपदी राहिले.या चर्चला १५ फेब्रुवारी २0१५ रोजी शंभर वर्षाचा पूर्ण काळ होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नॅझरीन चर्च चे प्रमुख पालक प्रभाकर मानमोठे यांनी सांगितले. वाशिम शहराला आरोग्य सेवेचे प्रथम कार्य नॅझरीन चर्च ने सुरु केले सन १९३५ मध्ये रेनॉल्ड हॉस्पीटल सुरु करण्याचे ठरले होते. पण ते १९३७ मध्ये प्रत्यक्षात सुरु झाले त्यावेळी डॉ.आफी स्पायकर यांनी परिङ्म्रम घेवून ही आरोग्य सेवा सुरु केली. त्यात प्रामुख्याने महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य सेवा मिळत होती. तेव्हा वाशिमकर तथा ग्रामीण भागात या रुगणालयाला बायांचा दवाखाना म्हणत असत. पुढे सन १९४७ स्वातंत्र काळानंतर पुरुषांनाही येथे आरोग्य सेवा मिळू लागली. त्यावेळी डॉ.फॉक्स, डॉ.मिल्लर, डॉ.इव्हलीन, या अमेरिकन डॉक्टरांसह डॉ.अरुण नोव्हा, डॉ.संबर्गीकर, ही नामांकीत डॉक्टर मंडळी होती.