शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नवदुर्गा मंडळांना मिळणार सवलतीचा वीजदर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:01 IST

वाशिम - सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने बुधवारी केले. ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार आहे.

ठळक मुद्देविज दराचा अधिक भार पडू नये म्हणून सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी . ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने बुधवारी केले. ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार आहे.आता धार्मिक सण, उत्सव सुरू होत असून, विज दराचा अधिक भार भाविकांसह दुर्गोत्सव मंडळावर पडू नये म्हणून सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी दिली जाणार आहे. कोणत्याही सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये १० पैसे अधिक १ रुपया २१ पैसे वहन (व्हिलींग) आकार व इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १० पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९९ पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, असे आवाहन महावितरणने केले.दक्षता घेण्याचे आवाहनसार्वजनिक दुर्गोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडून करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घ्यावी तसेच वायरिंगसाठी वापरण्यात येणारे ‘वायर’ हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने ‘वायर’चा उपयोग जपून करावा असे आवाहन महावितरणने केले. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.  विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा दुर्गोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे तसेच वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक असल्याचा दावा महावितरणने केला आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सार्वजनिक मंडळांनी वीजसुरक्षेबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले.