शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार रुपये कर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘खो’!

By admin | Updated: July 2, 2017 09:00 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही केले कर्ज वाटप बंद; शासन निर्णयाची अवहेलना.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट १.५ लाख रुपये कर्जमाफी जाहीर केली. सोबतच जे शेतकरी कर्जाचे हप्ते नियमित भरतात, त्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्यांना अग्रिम १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने मंजूर करण्याचे निर्देश होते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांकडून अद्याप एकाही शेतकऱ्यास १० हजार रुपये कर्ज देण्यात आलेले नाही. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही या स्वरूपातील कर्जवाटप प्रक्रिया बंद केल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करत, १ एप्रिल २०१२ नंतरच्या व ३० जून २०१६ पर्यंतच्या थकीत पीक कर्जाला माफ करण्याचा निर्णय घोषित केला. त्यानुसार, ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व शाखांमधून तत्काळ दहा हजारांचे अग्रिम कर्ज देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. मात्र, २१ जून २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना १ जुलै उलटूनही राष्ट्रीयीकृत बँकांनी कुठल्याच शेतकऱ्याला १० हजार रुपये अग्रिम कर्ज दिलेले नाही. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून यासंदर्भात सूचना प्राप्त नसल्याचे सांगितले जात आहे.शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रिम कर्ज देण्यासंदर्भात आरबीआयच्या कुठल्याच सूचना १ जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळेच राष्ट्रीयीकृत बँकांनी या स्वरूपातील कर्जवाटपास सुरूवात केलेली नाही. निर्देश प्राप्त होताच त्यावर अंमलबजावणी केली जाईल.- विजय नगराळेव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक