शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

पीककर्ज पुनर्गठणाला राष्ट्रीयीकृत बँकांचा कोलदांडा

By admin | Updated: December 6, 2014 01:22 IST

बँक ऑफ इंडिया रिसोड शाखेचा अपवाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १६६७६ शेतक-यांच्या कर्जांचे रुपांतरण.

संतोष वानखडे/वाशिम२0१४ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यातील गारपिटीने गारद झालेल्या आणि आता कोरड्या दुष्काळाच्या सावटाने घामाघूम होणार्‍या शेतकर्‍यांच्या मानगुटीवर खरीप पीककर्जाचे अव्वाच्यासव्वा व्याजाचे भूत बसले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी २0१३-१४ या सत्रातील पीककर्जाचे पुनर्गठण करण्याला चक्क दांडी मारली आहे तर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६ हजार ६७६ शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे रुपांतरण केले आहे.२0१३ मधील अतवृष्टी आणि २0१४ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यातील गारपिटीने शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फेरले. गारपिटीने नुकसान केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा म्हणून शासनाने मार्च २0१४ मध्ये काही निर्णय जाहीर केले होते. जे बाधित शेतकरी पीक कर्जाच्या परतफेडीस ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत मुदतवाढीचा लाभ घेतील, असे शेतकरी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेस पात्र राहतील. ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत पीककर्जाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना ह्यथकबाकीदारह्ण समजण्यात येऊ नये, बाधीत शेतकर्‍यांच्या शेती पीक कर्जाचे तीन वर्षाचे म्हणजेच २0१४-१५, २0१५-१६ व २0१६-१७ या कालावधीकरिता पुनर्गठन करण्यात येईल, पुनर्गठनाचा लाभ घेणारे शेतकरी सन २0१४-१५ या हंगामात पीक कर्ज घेण्यास पात्र ठरतील, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करावे, बाधीत क्षेत्रातील कोणतेही पात्र शेतकरी २0 मार्च २0१४ च्या शासन निर्णयातील उपाययोजनांच्या लाभांपासून वंचित राहणार नाहीत, याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दक्षता घ्यावी, या आदेशांची जिल्हास्तरावर तातडीने अंमलबजावणी करावी, आदी आदेश मार्च २0१४ मध्ये शासनाने जारी केलेले होते; मात्र या आदेशांना वाशिम जिल्ह्यात पायदळी तुडविले जात असल्याची बाब 'लोकमत'ने सर्वप्रथम चव्हाट्यावर आणली होती.