शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत कर्मचा-यांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

By admin | Updated: December 27, 2016 02:23 IST

आंदोलनात मालेगाव आणि मानोरा नगर पंचायत कर्मचा-यांचा सहभाग.

मानोरा, दि. २६- ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतमध्ये होऊनही कर्मचार्‍यांच्या समायोजनाचा तिढा मात्र १७ महिन्यांपासून कायम आहे. त्यामुळे कंटाळलेल्या मानोरा आणि मालेगाव नगर पंचायतमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांनी सोमवार, २६ डिसेंबर रोजी ह्यकामबंदह्ण आंदोलन करून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव ग्रामपंचायतीचे १७ जुलै २0१५ रोजी नगर पंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आले. यासह नगर विकास विभागाने नगर पंचायतीच्या आकृतीबंधास महिनाभरातच मान्यतादेखील दिली. मात्र, कर्मचार्‍यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. नगर पंचायती अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांना नगर पंचायतीच्या कामकाजाचे प्रशिक्षणसुद्धा अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे नगर पंचायतीत कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे. असे असताना त्यांना ग्रामपंचायत कर्मचार्‍यांप्रमाणेच सुविधा मिळत आहेत. तथापि, मानोरा आणि मालेगाव नगर पंचायतीत कार्यरत कर्मचार्‍यांचे नगर पंचायतीत समायोजन करून त्यानुसार वेतनश्रेणी लागू करावी. यासह नगर पंचायत कर्मचार्‍यांप्रमाणे सुविधा लागू कराव्यात, आदी न्यायोचित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता दोन्हीही नगर पंचायतमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांनी २६ डिसेंबर रोजी कामबंद आंदोलन करून शासकीय धोरणांचा निषेध नोंदविला. आजच्या आंदोलनात मालेगाव नगर पंचायतचे कर्मचारी एकनाथ आढाव, महादेव राऊत, संजय दहात्रे, प्रमोद हरणे, संतोष खवले, अवि काटेकर, शंकर इंगोले, शंकर बळी, विश्‍वपाल काटेकर, गणेश भनंगे, बबन पखाले, प्रकाश बळी, विठ्ठल चोपडे, सय्यद इरफान, गणेश भालेराव, महादेव ठाकरे, माणिक मोहले, शेख शोयब, सतीश महाकाल, रवी शर्मा, नागनाथ माने, इंद्रायणी अवचार, सुनील घायाळ, शंकर बळी, अतुल बळी, शेख बब्बू, श्रीराम सुर्वे, सतीश देवकते, सफाई कर्मचारी गंगा पवार, प्रमिला बोयन, राखी सौदवे, गजानन गायकवाड सहभागी झाले होते.