शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘नाफेड’च्या तूर खरेदीला ‘ब्रेक’!

By admin | Updated: February 24, 2017 02:04 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; माल साठविण्याकरिता गोदामेच नसल्याने पाचपैकी तीन केंद्र पडले बंद.

वाशिम, दि. २३- खरेदी केलेली तूर साठविण्याकरिता गोदामेच नसल्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या 'नाफेड'च्या तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. पाचपैकी तीन केंद्र बंद करण्यात आले असून, येत्या चार दिवसांत उर्वरित दोन केंद्रही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील तीन ठिकाणी 'नाफेड'ची खरेदी बंद झाल्यानंतर शेतकर्‍यांची पुन्हा पिळवणूक होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा खूपच कमी दराने तूर खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे.यंदा जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. गतवषीर्पेक्षा १९ हजार हेक्टरने तुरीचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात थोडी वाढ झाली असल्याने बाजारात या शेतमालाची मोठी आवक होत आहे. दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटलच्या दरापेक्षा कमी दरात व्यापार्‍यांकडून तुरीची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. अशात जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रीय सहकारी कृषी पणन महामंडळाकडून (नाफेड) तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. त्यामुळे नाफेडकडे शेतकर्‍यांचा कल वाढला. जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंतच नाफेडकडून ७६ हजार क्विंटलहून अधिक तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये नाफेडसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाने (एमएससीएफ) वाशिम, अनसिंग, मालेगाव आणि कारंजात मिळून ५८ हजार ९00 क्विंटल तूर खरेदी केली, तर विदर्भ पणन महामंडळाने (व्हीसीएमएफ) मंगरुळपीर येथे १८ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. नाफेडने खरेदी केलेली तूर ही राज्य आणि केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामांत साठविण्यात येत होती; परंतु वखार महामंडळाची गोदामे भरल्याने आता नाफेडसमोर खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगरुळपीर, मालेगाव आणि अनसिंग या ठिकाणची सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आली, तर वाशिम आणि कारंजा येथील गोदामेही भरत आली असल्याने या ठिकाणची खरेदी येत्या दोन दिवसांतच बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली.