शासनाच्या निर्देशानुसार राज्यात विविध ठिकाणी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अनसिंग व शिरपूर ग्रामपंचायतीची या अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानात समाविष्ट ग्रामपंचायतींना पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पाच तत्त्वांवर आधारित विषयावर कामे करावयाची आहेत. यासंदर्भात शिरपूर ग्रामपंचायतीकडून स्थानिक विश्वकर्मा संस्थानमध्ये २५ जानेवारी रोजी आढावा बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष आवचार होते. विस्ताराधिकारी माधव साखरे, यांच्यासह स्थापत्य उपविभागाचे उपअभियंता रवींद्र डोंगरे, नोडल अधिकारी देवकते, ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता जाधव, प्रशासक व्ही. टी. शिंदे व ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटविकास अधिकारी अवचार यांनी माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश व गरज समजावून सांगितली. तसेच विस्तार अधिकारी साखरे यांनी प्रगत करावयाची कामे व त्यावर मिळणारे गुण याची सखोल मार्गदर्शन उपस्थितांना केले. या आढावा बैठकीला स्वर्गीय पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत कलाने, संत ओंकारगीर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन वाहुरवाघ, अरिहंत विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नीलेश शिंदे, संतोष महादू भालेराव, तलाठी जे.एन.साठे, सुधीर भुरे, बंडू चोपडे, सामाजिक कार्यकर्ते श्याम दीक्षित, अंगणवाडी सेविका अर्चना जहेरव, अर्चना भोसले, कांता मोरे, निर्मला सपकाळ, लक्ष्मी सुर्वे, साधना भांदुर्गे, छाया झोरे, उषा कांबळे, आशा भांदुर्गे, शेख सुलतान, गजानन देशमुख, कैलास भालेराव, शशिकांत देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमा माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत सामूहिक शपथ घेण्यात आली.
शिरपूर जैन येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST