शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या वादातून कवठा येथील इसमाची हत्या

By admin | Updated: November 2, 2015 03:00 IST

आरोपीला अटक; न्यायालयापुढे आज करणार हजर.

रिसोड (जि. वाशिम): वन्यप्राण्याच्या शिकारीच्या वादातून कवठा खुर्द येथील इसमावर प्राणघातक हल्ला झाला होता. जखमी इसमाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. शामा कंठू भोसले (४५) असे मृतकाचे नाव असून, याप्रकरणी संदीप आत्माराम पुंड (२७) या आरोपीस पोलिसांनी अटक केली. रिसोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान कवठा येथील आरोपी संदीप पुंड हा शामा भोसले यांच्या घरी जाऊन शिकारीची मागणी करीत होता. शाम भोसले याने संदीप यास आज शिकार केली नसल्याचे सांगितले. त्यांनतरही संदीप पुंड हा तू केलेली शिकार दे, असा वारंवार तगादा शामा यांच्याकडे लावत होता. या दरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीचा वाद विकोपाला जाऊन संदीप पुंड याने शामा भोसले यांच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकूचा वार करून जबर जखमी केले. जखमी भोसले यास पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे भरती करण्यात आले होते. भोसले यांचा अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच त्यांना अकोला येथे सामान्य रुग्णालयात उपचार करून औरंगाबाद येथे पुढील उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान भोसले यांचा औरंगाबाद येथे ३१ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेच्या दुसर्‍या दिवशीच पोलिसांनी आरोपी संदीप पुंड यास अटक करून प्रारंभी कलम ३२६, ३ (१) १0 भादंवि नुसार जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. न्यायालयात आरोपीला हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, जखमी भोसले यांचा मृत्यू झाल्याने सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा वर्ग करण्यात आल्याने आरोपीस पोलीस पुन्हा ताब्यात घेऊन खुनाच्या तपास कामाकरिता पोलीस कोठडीत घेण्याकरिता न्यायालयासमोर हजर करणार आहेत. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहे.