शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने आवळल्या वीजचोरट्यांच्या मुसक्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वीजचोरीचा प्रकार सुरू असल्याने महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महावितरणचा स्वतंत्र विभाग या प्रकारावर नियंत्रण ...

गेल्या अनेक वर्षांपासून वीजचोरीचा प्रकार सुरू असल्याने महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महावितरणचा स्वतंत्र विभाग या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत असला तरी, अपेक्षित प्रमाणात वीजचोरीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. त्यामुळेच महावितरणकडून आता प्रत्येक वीज उपकेंद्रांतर्गत होणारी वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणचे पथक गावागावात फिरून वीजेचोरीचा शोध घेत आहे. त्यात गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ५९३ वीजग्राहकांची तपासणी करण्यात आली असून, त्यात २१० ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळून आले असून, वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणच्या पथकाने संबंधिताना जवळपास दहा लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

-----

१६९ वीजजोडण्या खंडित

वीजचोरीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाभरातील ५९३ वीजजोडण्यांची तपासणी केली असता त्यात २१० ठिकाणी वीजचोरीचा प्रकार होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी १६९ ग्राहकांची वीजजोडणी महावितरणच्या पथकाने खंडित केली.

---

सेक्शन इंचार्जला महिन्यात २०० चोऱ्या पकडण्याचे उद्दिष्ट

वीजचोरीवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३२ सेक्शन इंचार्जना (कनिष्ठ अभियंता) महिन्याकाठी २०० चोऱ्या पकडण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सेक्शन इंचार्ज त्यांच्या पथकासह गावागावात भेट देऊन जोडण्यांची तपासणी करीत आहेत.

----

१९ प्रकरणात तडजोड

वीजचोरी रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत नियमांचे उल्लंघन करून विजेचा वापर करीत महावितरणचे नुकसान केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एकूण २१० ग्राहकांपैकी १६९ ग्राहकांना दंड ठोठावून त्यांची जोडणी खंडित करतानाच १९ प्रकरणांत महावितरणच्या पथकाने वीजचोरीच्या मोजमापानुसार रक्कम आकारून तडजोडही केली.

------

असे आहेत वीजचोरीचे प्रकार

मीटर सीटीमध्ये रेझिटन्स बसविणे,

सीटी वायर कट करणे,

मीटर बायपास करणे,

थेट खांबावर हूक टाकणे

---------

कोट : जिल्ह्यात वीजचोरीचा प्रकार वाढला आहे. यामुळे महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याने वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यात वीज जोडण्यांची तपासणी करून दोषी आढळलेल्या ग्राहकांवर वीज अधिनियमानुसार कारवाई केली जात आहे.

-आर.जी. तायडे,

कार्यकारी अभियंता, वाशिम