वाशिम : केंद्र सरकारने भारतात वस्तू व सेवा कर कायदा १ जुलै २०१७ राेजी लागू केला. या कायद्यात दैनंदिन हाेत असलेल्या बदलामुळे व्यापारी, कर सल्लागार, सनदी लेखापाल त्रस्त झाले आहेत. याच्या निषेधार्थ २९ जानेवारी राेजी जीएसटी कार्यालयासमाेर कर सल्लागार संघटनेच्या वतीने धरणे आंदाेलन करण्यात येत आहे.
गत तीन ते चार वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. कर खात्यास कर चुकविणाऱ्यांना जेरबंद करता येत नाही म्हणून दरवर्षी किचकट तरतुदी लादल्या जात असल्याच्या निषेधार्थ वाशिम येथील पुसद नाकानजीक असलेल्या जीएसटी कार्यालयासमाेर २९ जानेवारी राेजी कर सल्लागार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत धरणे आंदाेलन करणार आहेत, असे संघटनेने कळविले आहे.