शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

नाफेड खरेदीसाठी हालचाली!

By admin | Updated: June 8, 2017 02:16 IST

आज बैठक: सहायक निबंधकांचे मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर ३१ तारखेच्या मुदतीपर्यंत तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे. यासाठी शासनाने मुदतवाढ दिली असतानाही खरेदी अद्याप सुरू झाली नाही. यासंदर्भात चर्चा करून तत्काळ खरेदी जिल्हा सहायक निबंधकांनी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह इतर संबंधितांची ८ जून रोजी वाशिम येथे बैठक आयोजित केली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी ६ जून रोजी पाठविले आहे.राज्य शासनाच्या २६ मे रोजीच्या निर्णयानुसार नाफेडच्या तूर खरेदीला ३१ मेपर्यंतची मुदतवाढ मिळाली होती. यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांकडून नाव नोंदणी करून शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत तूर खरेदीसाठी टोकण देण्याचे कामकाज करण्यात आले. त्या कालावधित जिल्ह्यातील सहाही नाफेडच्या केंद्रावर आलेल्या तुरीपैकी २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तुरीची मोजणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण असून, शेतकरी व शेतकरी संघटना या तुरीची मोजणी न झाल्यास आंदोलन करणार असल्याच्या तक्रारी बाजार समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही या संदर्भातील तक्रारी आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर ६ जून रोजी जिल्हा सहायक निबंधक कार्यालयात बाजार समितीच्या सचिवांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात तत्काळ नाफेड तूर खरेदी सुरू करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यानुसार जिल्हा सहायक निबंधकांनी नाफेड तूर खरेदी तत्काळ सुरू करणे, आजपर्यंत खरेदी केलेल्या तुरीच्या रकमा जमा करणे, नाफेडने खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणुकीची व्यवस्था व खरेदी करणाऱ्या सबएजंटच्या समस्यांवर विचार करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह एका बैठकीचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांचे चुकारे करण्याबाबतही चर्चा जिल्ह्यात नाफेडची खरेदी विविध कारणांमुळे वारंवार अडचणीत आल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाच, शिवाय खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून मिळाले नसल्याने त्यांचा खरेदीचा हंगाम संकटात सापडला आहे. या सर्व मुद्यांवर जिल्हा सहाय्यकांकडून गुरुवारी आयोजित बैठकीत चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्याशिवाय ज्या संस्थांमार्फत नाफेडची तूर खरेदी केली जात आहे. त्या संस्थांना फंड पुरविण्याबाबतही जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तातडीने नाफेडची खरेदी सुरू करायची आहे. त्याबाबत नियोजन व चर्चा करण्यासाठी उद्या बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. - रमेश कटके, जिल्हा सहायक निबंधक, वाशिम