शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदान चळवळीला आली गती

By admin | Updated: August 5, 2014 20:26 IST

जिल्हयात २00८ ते आजपर्यंत ४१७ नेत्रबुबळे जमा करून दृष्टीहिनांना दृष्टी देण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात आला आहे.

वाशिम : राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गंत गरजु रूग्णांना दृष्टी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या कार्यात जिल्हयात २00८ ते आजपर्यंत ४१७ नेत्रबुबळे जमा करून दृष्टीहिनांना दृष्टी देण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे एनजीओ नसतांना शासकीय यंत्रणेने जिल्हयात नेत्रदान चळवळीस दिलेले योगदान मोलाचे आहे.जिल्हा शासकीय यंत्रणेमार्फत राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गंत जास्तीत जास्त रूग्णांना लाभ मिळावा याकरीता शिबीरे, कांचबिंदु , मोतीबिंदू निदान व उपचार शिबीरे राबवून कार्यक्रमास गती दिली. १९९८ आधी अकोला जिल्हा असल्याने सदर कार्यक्रम अकोला येथून राबविल्या जायचा. २00३ पासून स्वतंत्र कारभार वाशिम सुरू झाला. या अंतर्गंत प्रचार व प्रसार करून या मोहीमेला चांगली गती दिली. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत ---- एचओटीए--- परवानगी घेवून नेत्रबुबूळे जमा करणारे केंद्र वाशिम येथे २00८-0९ मध्ये स्थापन करण्यात आले. केंद्र स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम नेत्रदान करण्याचा मान ३0 सप्टेंबर २00८ रोजी स्व.कलावती घनश्याम अग्रवाल यांना मिळून केंद्रास सुरूवात करण्यात आली. सुरूवातीच्या वर्षिच म्हणजे २00८-0९ मध्ये एकूण २२ नेत्रबुबुळे जमा करण्यात आले. २00९-१0 मध्ये ६४, २0१0-११ मध्ये १0८, २0११-१२ मध्ये ६६, २0१२-१३ मध्ये ६८, २0१३-१४ मध्ये ६७ व २0१४ मध्ये आतापर्यंत २२ असे एकूण ४१७ जणांचे नेत्रबुबुळे जमा करण्यात आले. मात्र जिल्हयातील गरजुस नेत्र प्रत्यारोपण करायचे असल्यास नेत्रपेढी लांब पडते. नेत्रप्रत्यारोपणासाठी सर्वप्रथम नेत्रपेढीमध्ये स्वताचे नाव नोंदून , तपासणी करून नेत्रपेढीच्या प्रतिक्षा यादीत नाव समाविष्ट करावे लागते. अमरावती विभागात यवतमाळ व अकोला येथे वैद्यकीय महाविद्यालय आहे येथे नेत्रपेढी असती तर या विभागातील गरजु अंध रूग्णांवर नेत्रबुबुळ प्रत्यारोपण करता आले असते. जिल्हयात नेत्रदान चळवळीला गतीमान करण्यासाठी नियंत्रक समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, कार्यकारी समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांची टिम प्रयत्नशिल आहे. वाशिम जिल्हयात नेत्रदानाचे काम पूर्णत: शासकीय यंत्रणेमार्फतच राबविण्यात येते. येथे या कामासाठी कोणत्याच प्रकारचे एनजीओ नाही जे ईतर ठिकाणी दिसून येतात. हे काम शासकीय योजनेनुसारचं व्हायला पाहीजे कारण शासन यावर करोडो रूपये खर्च करीत आहे.