कनेरगाव नाका (जि. वाशिम): पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना गळफास दिल्यानंतर त्यांच्या मातेने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील कनेरगाव नाका येथून जवळच असलेल्या सवना (ता. सेनगांव, जि.हिंगोली) येथे सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. आरती प्रवीण नायक (२६ ), पूर्वी प्रवीण नायक (४) व किरण प्रवीण नायक (२ ) अशी मृतकांची नावे आहेत. सवना येथील वैरागी महाराज संस्थानवर दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु असताना आरती नायक हिने आपल्या दोन मुली पूर्वी आणि किरण यांना पाळण्याच्या दोरीने गळफास देऊन पलंगावर मृतावस्थेत टाकले आणि त्यानंतर स्वत:ही घरातील टिनपत्र्याखाली असलेल्या लोखंडी पट्टीला दोरी लावून गळफास घेत आत्महत्या केली.
दोन चिमुकल्या मुलींसह मातेची आत्महत्या
By admin | Updated: May 2, 2017 00:23 IST