शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेतील साहित्य माणसाचे व्यक्तिमत्व घडविते - जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. जटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:05 IST

वाशिम : मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार लहान मुले अनुकरण करतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील वातावरणाचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर होतो. तसेच मातृभाषेतील शिक्षण व साहित्य हे माणसाचे व्यक्तिमत्व घडविते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. जटाळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार लहान मुले अनुकरण करतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील वातावरणाचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर होतो. तसेच मातृभाषेतील शिक्षण व साहित्य हे माणसाचे व्यक्तिमत्व घडविते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. जटाळे यांनी केले. वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात १ ते १५ जानेवारी या कालावधीत आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ‘काव्याग्रह’चे व्यवस्थापकीय संपादक विठ्ठल जोशी, जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष अ‍ॅड. अमरसिंह रेशवाल, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. जटाळे पुढे म्हणाले, माता आणि मातृभाषा आपल्या जीवनाला दिशा देतात. मातृभाषेतील साहित्य वाचनाची आवड जोपासली पाहिजे. गेल्या १५ दिवसांमध्ये जिल्हा न्यायालयात आयोजित विविध उपक्रमांमुळे मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत लेखक, कवी यांचे विचार ऐकण्याची संधी न्यायिक अधिकारी व विधिज्ञांना मिळाली. या विचारांमुळे आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारण्यास मदत होणार आहे. परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून मराठी भाषा व साहित्याच्या अनुषंगाने झालेल्या मंथनातून मातृभाषेची महती, तिचे वैभव आपल्याला माहित झाले आहे, असे ते यावेळी म्हणाले. ‘काव्याग्रह’चे जोशी, अ‍ॅड. गवळी यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी न्या. एस.पी. शिंदे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, साहित्यिक प्रा. धोंडूजा इंगोले, किसन गंगावणे, कथाकार पांडुरंग मोरे, राजेश ठवकर, कवी महेंद्र ताजने, प्रा. सुनिता अवचार आदिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास न्या. एस.बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस.पी. बुंदे, न्या. एस.पी. वानखेडे, न्या. एस.व्ही. फुलबांधे, न्या. डॉ. यू.टी. मुसळे, न्या. के.बी. गीते, न्या. पी.एच. नेरकर, जिल्हा विधीज्ञ संघाच्या कोषाध्यक्ष अ‍ॅड. श्रध्दा अग्रवाल, सचिव यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव अ‍ॅड. प्रसाद ढवळे यांनी केले.

टॅग्स :Washim Anti corruption departmentवाशिम लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग