शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईने दिला मुलाला पुनर्जन्म!

By admin | Updated: September 2, 2014 23:29 IST

साखरखेर्डा परिसरातील एका आईने मुलाला वाचविण्यासाठी स्वत:ची किडनी दिली आहे.

अशोक इंगळे/सिंदखेडराजा

पोटचा गोळा संकटात सापडला की, कोणतीही आई कोणताही निर्णय घेताना मागे पुढे पाहत नाही. साखरखेर्डा परिसरातील एका आईने मुलाला वाचविण्यासाठी स्वत:ची किडनी देऊन, याची प्रचिती दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील मूळ रहिवासी, माजी सैनिक बद्रीनाथ यशवंतराव गाडगे हे सैन्य दलातून सेवानवृत्त झाल्यापासून मेहकर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा पहिला मुलगा दिपक हा जन्मत: व्यंग, तर दुसरा मुलगा रविंद्र याला वयाच्या २५ व्या वर्षीपासून किडनीच्या आजाराने ग्रासले. एप्रिल महिन्यापासून तो ह्यडायलासिसह्णवर होता. रविंद्र इंजिनिअर असून, त्याला याच महिन्यात कंपनीकडून र्जमनीच्या दौर्‍यावर जाण्याची संधी मिळाली होती; मात्र त्याचवेळी त्याचा किडनीचा त्रास वाढला. प्रारंभी त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. गत वर्षभरात रविंद्रच्या आजारावर दहा लाख रुपये खर्च करण्यात आले; मात्र आजारपण वाढतच गेले. दरम्यान, रविंद्रची पुन्हा तपासणी केली असता, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मुलाच्या भविष्यासाठी त्याची आई सुमन गाडगे (४९) यांनी स्वत:ची किडनी त्याला दिली. औरंगाबाद येथे एका रुग्णालयात रविंद्रवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची आई खंडाळा येथील जि.प.शाळेवर शिक्षिका असून, त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथे उपचार सुरु आहे.