शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वदूर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:42 IST

वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. 

ठळक मुद्देपैनगंगा नदीवरील बॅरेजेस तुडुंब तूर, कपाशीसह हळदीच्या पिकाला आधार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. गत चार-पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, तर काही भागात केवळ ढगाळ वातावरण आहे. तीन-चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही काही भागात सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांचीच चिंता वाढली होती. गुरुवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. सकाळी ९ ते १२ या वेळेत जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने गत आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. वाशिम शहरासह मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मालेगाव व वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस होता. शुक्रवारी वाशिम तालुक्यात संततधार झाल्याने ११ बॅरेजेस् तुडुंब भरली. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाच्या आशा पल्लवित होत आहेत. दुपारी १२ वाजतानंतर  पावसाचा जोर ओसरला. वादळवारा व विजांचा कडकडाट नसल्याने जिल्ह्यात कुठेही वित्त वा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा..वाशिम व परिसरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पाटबंधारे विभागाने पैनगंगा नदी तिरावरील तसेच बॅरेज परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ११ बॅरेजेस्चे गेट परिचलन करणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी नदीकाठावरील नागरिकांना तसेच संबंधित गावांत दवंडीद्वारे सावधानतेचा इशारा द्यावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली. वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळी, सोनगव्हाण, ढिल्ली, टणका, जयपूर या ११ बॅरेजमधून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी स्पष्ट केले.-