शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेहून अधिक खासगी शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

वाशिम : जिल्ह्यातील ४० टक्के अनुदानित शाळांवर कार्यरत पाचशेपेक्षा अधिक शिक्षकांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन थकले आहे. सप्टेंबर ...

वाशिम : जिल्ह्यातील ४० टक्के अनुदानित शाळांवर कार्यरत पाचशेपेक्षा अधिक शिक्षकांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन थकले आहे. सप्टेंबर महिन्याची ७ तारीख ओलांडली असताना २८०० शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले, तर ४० टक्के अनुदानित शिक्षकांचे वेतन मात्र अदा झाले नाही. परिणामी त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे.

वाशिम जिल्ह्यात एकूण प्राथमिक आणि माध्यमिक मिळून ३४० खासगी शाळा आहेत. या शाळांवर ३५०० शिक्षक कार्यरत आहेत. शासनाने दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन करण्याचे आदेश दिले असताना त्याची दखल घेतली जात नाही. त्यातच अनेकदा दोन ते तीन महिने शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागते. वेतन प्रलंबित राहत असल्याने बँकेचे कर्ज घेतलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना बँकांकडून एक्सट्रा पेनल्टी लागते. व्याजही शिल्लकचे भरावे लागते. किराणा, भाजीपाला, वीज बिल, मुलांच्या शिक्षणाचा, आजाराचा, सणावाराचा खर्च, आदींचे नियोजन बिघडून जाते.

००००००००००००००००००००

दोन वर्षांत एकदाही पहिल्या तारखेस वेतन नाही

जिल्ह्यातील संस्थांच्या शाळावरील शिक्षकांचे वेतन गेल्या दोन वर्षापासून एकाही महिन्यात १ तारखेला झालेला नाही. साधारणत: १५ किंवा २० तारखेनंतरच पगार होतात. वेतन पथक आणि कोषागार कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वरिष्ठ स्तरावरून निधीच मिळाला नसल्याचे कारण सांगितले जाते. वेतनाला सतत विलंब होत असल्याने शिक्षकांचे नियोजन कोलमडून ते आर्थिक संकटात सापडत आहेत.

०००००००००००००००००

-जिल्ह्यातील एकूण अनुदानित शाळा -३४०

माध्यमिक शिक्षक - १८२०

प्राथमिक शिक्षक - २६८०

-----------

तालुकानिहाय अनुदानित शाळा

तालुका - शाळा

वाशिम - ७५

कारंजा - ५६

मालेगाव - ३७

रिसोड - ६७

मंगरुळ - ५३

मानोरा - ५२

-------------------------

कोट: खासगी शिक्षकांचे वेतन आमच्याकडून थांबलेले नाही. ७ सप्टेंबर रोजी ४४२ आणि ४७८ हेडखालील शिक्षकांचे वेतन अदा झाले, तर ३३६१ हेडखालील अर्थाल ४० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतनही येत्या दोन दिवसांत अदा केले जाणार आहे.

-बालकृष्ण इंगोले,

वेतन पथक अधीक्षक, वाशिम

---------------------

कोट: कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी सर्व शिक्षक व्यवस्थित ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. संसारिक जबाबदारी पूर्ण करताना त्यांनाही वेळेवर पगार मिळावा, ही अपेक्षा आहे. ही समस्या सर्वच खासगी शाळा शिक्षकांची आहे.

-संदीप देशमुख,

जिल्हाध्यक्ष, शिक्षक महासंघ.