शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापकाकडून मुद्रा योजनेची चेष्टा!

By admin | Updated: October 14, 2015 01:57 IST

मंगरुळपीर येथील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी.

मंगरुळपीर (जि. वाशिम): औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी शासनातर्फे उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान मूद्रा योजनेची चेष्टा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाकडून होत असल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मित्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे. गंगाधर कांबळे यांनी मु्ख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे, की मित्रा (महादलित इंडस्ट्रियल टेंडन्सी रिफॉर्मिस्ट असोसिएशन) या उद्योजकीय संघटनेव्दारे मार्च २0१५ ते मार्च २0१६ पर्यंत एक वर्ष कालावधीचे औद्योगिक साक्षरता अभियान संपूर्ण राज्यभर राबविल्या जात असून, विविध उपक्रमाव्दारे उद्योगाला चालना देणार्‍या मानसिकतेविषयी जनजागृती केल्या जात आहे. मुद्रा योजनेची विस्तृत माहिती सामान्य जनतेला देता यावी म्हणून आपण स्वत: बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंगरुळपीर येथील शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली असता. त्यावेळी त्यांनी माहिती देणे टाळले, शिवाय आपल्याशी उध्दटपणे संवाद साधून मुद्रा योजनेची चेष्टा केली. पंतप्रधान मुद्रा योजना बेरोजगारीवर मात करण्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरणारी आहे. शासनाने सिडबी ऐवजी प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकाकडे या योजनेचा कारभार सोपविल्यामुळे एक दिलासाही मिळाला आहे; परंतु बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवस्थापक या योजनेची टर उडविणार्‍या भाषेचा वापर करून माहिती घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला अपमानजनक वागणूक देत आहेत. आपल्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडते, तर हे व्यवस्थापक सामान्य नागरिकांशी यापेक्षाही वाईटपणे वागत असतील, हे स्पष्ट होते. शासनाने अशा बँक व्यवस्थापकावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही कांबळे यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. मुद्रा योजनेसंदर्भात माहिती देण्याचे काम योग्य पद्धतीने केले जात आहे. या योजनेचे उदिष्ट पूर्ण झाले असून, पुढील टप्यात येणार्‍या शासकीय निधीमधून अनेकांना व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे बँकेचे शाखा व्यवस्थापक गिरीश राऊत यांनी स्पष्ट केले.