मानोरा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोयजना येथे आरोपीने महिलेचा विनयभंग केला. याबाबत प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी सुरेश गुलाब पवार याच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम सोयजना येथील शेतशिवारात १५ एप्रिलच्या सायंकाळी फिर्यादी महिला व तिचा पती काम करीत होते. यादरम्यान पती तेथून घरी निघून गेला असता, आरोपी सुरेश पवार याने पाणी पिण्यास मागितले व वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला. अशा प्रकारच्या दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सुरेश पवारविरुद्ध कलम ३५४, ३२३, ५०४ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास बीट जमादार शिवा राठोड, इश्वर बाकल, आकाश बाभूळकर करीत आहेत.
महिलेचा विनयभंग; आरोपीविरूद्ध गुन्हा!
By admin | Updated: April 18, 2017 01:22 IST