शिरपूर जैन : जांब अढाव येथील २५ वर्षीय विवाहित महिलेचा गावातीलच संजय किसन वाघ याने विनयभंग केला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध १३ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.जांब अढाव येथील पीडित महिला ८ मेच्या सायंकाळी ६.३0 वाजता घरात स्वयंपाक करीत होती. यावेळी आरोपीने घरात प्रवेश करून ह्यतू मला फार आवडतेह्ण, असे म्हणत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ४५२, ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला.
महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा!
By admin | Updated: May 14, 2017 02:21 IST