रिसोड, दि. ३१-शहरातील भाजी मंडी परिसरात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३0 ऑक्टोबर रोजी नितीन सुनिल इंगोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.भाजी मंडी परिसरातील एक सोळा वर्षीय युवती तिच्या आतेभावासोबत नगर परिषदेच्या शाळेसमोरील दुकानावर फटाके खरेदीसाठी सायंकाळी सातच्या सुमारास जात असताना गजानन टॉकीज परिसरात अंधाराचा फायदा घेत नितीन इंगोले याने दुचाकीवर येत सदर युवतीची छेडछाड करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पिडीत युवतीने दिली. यावरुन नितीन इंगोले विरूद्ध बाल लैगिक प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By admin | Updated: October 31, 2016 23:57 IST