या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., साहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव, उत्तमचंद बगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार झनक यांनी सीसीटीव्ही प्रणालीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. पालकमंत्री देसाई म्हणाले, रिसोड पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याने शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरासोबत स्पीकरही लावण्यात आल्याने नियंत्रण कक्षातूनच रस्त्यावरील वाहनधारकांना सूचना देणेही शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार झनक म्हणाले, रिसोड शहर सुरक्षित राहावे, यासाठी शहरात ३६ सीसीटीव्ही कॅमेरे व ६ स्पीकर बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात सीसीटीव्ही बसविणे, ही काळाची गरज होती. यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असे त्यांनी सांगितले.
आधुनिक साधनांमुळे पोलिसांना कर्तव्य बजाविताना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST