शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोर ठरला अक्षयच्या मृत्यूस कारणीभूत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:09 IST

इंझोरी: येथील रहिवासी गोपाल राऊत यांचा मुलगा अक्षय राऊतचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात एका मोबाइल चोरट्या मुलाने रेल्वे धावत असताना हातून मोबाइल हिसकावल्याने अक्षयचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. अफजल गणी (१७) असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळले आहे. 

ठळक मुद्दे२२ ऑगस्ट रोजी रेल्वेतून पडल्याने अक्षयचा मृत्यू रेल्वे धावत असताना मोबाइल हिसकल्यामुळे घडली घटनाबडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: येथील रहिवासी गोपाल राऊत यांचा मुलगा अक्षय राऊतचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात एका मोबाइल चोरट्या मुलाने रेल्वे धावत असताना हातून मोबाइल हिसकावल्याने अक्षयचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. अफजल गणी (१७) असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळले आहे. मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाल राऊत यांचा थोरला मुलगा अक्षय राऊत (२२) याचा २२ ऑगस्ट रोजी बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली चिरडल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करणार्‍या रेल्वे पोलिसांनी काळजीपूर्वक चौकशी करून पुरावे मिळविले आणि त्या पुराव्यांचा आधारे तपासाची चक्रे फिरविली. यामध्ये बडनेरा रेल्वे स्टेशनवरून रेल्वे निघाल्यानंतर काही अंतरावर रेल्वे डब्याच्या गेटवर बसलेला अक्षय मोबाइलवर मेसेज पाहत असताना खाली असलेल्या अफजलने अक्षयच्या हातचा मोबाइल हिसकावला. त्यामुळे अक्षयचा तोल जाऊन तो खाली पडला आणि रेल्वेखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला, असे उघड झाले. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांच्यावतीने अल्पवयीन असलेल्या अफजलवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरूच होती. दरम्यान, आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधातील खटला हा बाल न्यायालयात चालणार असल्याचे बडनेरा रेल्वे पोलीस निरीक्षक पी. व्ही. चक्रे  यांनी सांगितले.