शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ योजनेच्या यादीतून वृद्ध दाम्पत्याचे नाव गहाळ

By admin | Updated: October 29, 2014 01:22 IST

विळेगाव येथील प्रकार : शासनाच्या मदतीपासून वंचित.

विळेगाव (कारंजा, जि. वाशिम): कारंजा तालुक्यातील विळेगावच्या वृद्ध दाम्पत्याची नावे श्रावणबाळ योजनेच्या यादीतून गायब झाल्यामुळे हे निराधार दाम्पत्य शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. विळेगाव खुळे येथे सागर अंबादास राठोड आणि अंबादास प्रताप राठोड हे निराधार वृद्ध दाम्पत्य राहते. या दाम्पत्याने शासनाच्या श्रावणबाळ योजनेंतर्गत शासकीय अनुदान मिळावे म्हणून या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी गावच्या तलाठय़ांमार्फत ११ ऑगस्ट २0१४ रोजी अर्ज पाठविला होता. तलाठय़ांनीही या संदर्भातील यादी तयार क रून आणि संबंधितांक डून आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून १४ लोकांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाकडे सादर केली. यातील तीन नावे त्रुटीमध्ये वगळण्यात आली; परंतु सागर अंबादास राठोड आणि अंबादास प्रताप राठोड या दाम्पत्याची नावेच या यादीमध्ये नसल्याचे या संदर्भात तहसीलमध्ये चौकशी केल्यानंतर सांगण्यात आले. या वृद्ध दाम्पत्याने वयाची ७0 ओलांडली आहे. त्यांच्या मोठय़ा मुलाचा मृत्यू झाला, तर लहान मुलगा लग्नानंतर पत्नीसह मुंबईला निघून गेल्यामुळे हे दाम्पत्य पूर्णपणे निराधार झाले असून, निराधार असल्याने शासकीय योजनेंतर्गत आपल्याला मदत मिळावी म्हणून त्यांनी दोन-तीन वेळा अर्जही सादर केले; परंतु त्यांचे अर्ज नामंजूर झाले. त्यातच श्रावणबाळ योजनेच्या यादीत त्यांचे नावच नसल्याचे कळल्यामुळे हे दाम्पत्य निराश झाले असून, या धक्क्यामुळे वृद्ध दाम्पत्याची तब्येतही खालावली आहे. त्यांनी श्रावणबाळ योजनेसाठी दाखल केलेला अर्जच गहाळ झाल्याची शक्यता असून, या प्रकरणी जबाबदार अधिकार्‍यांनी काळजी घेऊन या निराधार वृद्ध दाम्पत्यास श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.