शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी वाहन खरेदीत ४२ लाख रुपयांचा गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:10 IST

खंडेलवाल यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात ...

खंडेलवाल यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी. राज्य अभियान संचालनालयाने अमरावती विभागातील सर्व स्थानिक संस्थाचे घनकचरा व्यवस्थापनाचे सविस्तर प्रकल्प अहवाल मार्स प्लॉनिंग ॲन्ड इंजिनिअरिंग सीस लि. या संस्थेची नेमणूक केलेली असून या प्रकल्प अहवालानुसार १७ घंटागाड्या खरेदी करण्याकरिता निविदा शासनाच्या ई मार्केटप्लस पोर्टलवरून खरेदी करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. नगरपालिकेने सदर प्रकल्प अहवालानुसार १७ घंटागाड्या खरेदी करण्याकरिता २५ नोव्हेंबरच्या ऑर्डरशिटनुसार ३ डिसेंबर २०२० रोजी पोर्टलवर निविदा प्रसिध्द केली होती. निविदा ऑनलाइन प्रसिध्द करताना वर्कशिटनुसार नगर परिषदेच्या मंजूर घनकचरा प्रकल्प अहवालानुसार टाटा, महिंद्रा, फोर्स अथवा तत्सम प्रकारच्या १.७ क्यूबिक मीटर क्षमतेचे दोन कप्पे असलेली १७ चारचाकी वाहने खरेदी करावयाचे आहेत, असे निविदेत नमूद करणे आवश्यक असताना संबंधित कर्मचाऱ्यांनी निविदा पोर्टलवर प्रसिध्द करताना वाहनाचा चेसीज नंबर टाटाचा असला पाहिजे असा स्पष्ट उल्लेख केला. याचा अर्थ निविदा फक्त टाटा कंपनीचेच वाहन खरेदी करण्याकरिता प्रसिध्द करण्यात आल्याचे सिद्ध होते. त्यामुळे ही बाब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच न.प. ऑर्डरशिटचे उल्लंघन करणारी आहे. सदर प्रकल्प अहवालानुसार व ऑर्डरशिटनुसार एकूण १७ घंटागाड्या ६ लाख रुपये प्रत्येकी याप्रमाणे एकूण १ कोटी २ लाख रुपयांची निविदा प्रसिध्द करणे बंधनकारक होते. मात्र न. प.मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदेचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की ,वाहन खरेदी निविदेची रक्कम १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपयांची प्रसिध्द करण्यात आली आहे. वास्तविक पाहता सदर निविदेची रक्कम १ कोटी २ लाख रुपये अपेक्षित असताना यामध्ये सरळसरळ ४२ लाख ५० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खंडेलवाल यांनी केला आहे. याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा कार्यादेश देण्यापासून मुख्याधिकारी यांना तत्काळ थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली.

....................

निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली आहे; परंतु यात नगर परिषदेचे नुकसान होत असेल, तर ही निविदाप्रक्रिया रद्द करण्यात येईल.

-दीपक मोरे,

मुख्याधिकारी, न.प., वाशिम